ताजी बातमी ऑनलाईन टीम
गेल्या वर्षी बाजार कर वसुलीचा मक्ता यशस्वी झाला. या मक्त्याची मुदत १७ ऑक्टोबरला संपणार आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनाने तातडीने हालचाली करीत बाजार कर वसुलीचा खाजगी पद्धतीने मक्ता देणाच्या कामाची नविन निविदा प्रसिद्ध केली आहे. सदरचा वार्षिक मक्ता तब्बल ९४ लाख रूपयांचा आहे. खाजगी पद्धतीने पुढील दोन वर्षाच्या मुदतीने मक्ता दिला जाणार आहे. पण पहिल्या वर्षी मंजूर झालेल्या रकमेत पुढील वर्षी १० टक्के वाढ केली जाणार आहे.
पूर्वी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून बाजार कराची वसुली केली जात होती. आठवडा बाजारासह दिवाळी व गणेशोत्सवावेळी लागणाऱ्या स्टॉलधारकांकडून भुईभाडेपोटी बाजार कर आकारणी महापालिकेकडून केली जाते. गेल्या वर्षी या कामाचा मक्ता देण्यात आला. गेल्या वर्षी ८४ लाखांचे उत्पन्न पालिकेला मिळाले. सुरुवातीला भाजीपाला, फळ विक्रेत्यांच्या विरोध होता. मात्र महापालिका झाल्यानंतर उत्पन्न वाढीसाठी या कामाचा मक्ता देण्यात आला. यातून महानगरपालिकेच्या उत्पन्ना मोठी वाढ झाली आहे. आता पुढील दोन वर्षासाठी या कामाचा मक्ता देण्यासाठी निविदा काढली आहे. ९४ लाखांचा हा मक्ता आहे. जर यामध्ये मंजूर निविदा रक्कम वाढल्यास पुढील वर्षी दहा टक्के त्यामध्ये वाढ होणार आहे.