Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगराज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार; ब्ल्यू प्रिंट तयार, काय असेल टाईमटेबल?

राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार; ब्ल्यू प्रिंट तयार, काय असेल टाईमटेबल?

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. आता निवडणूक आयोगाची तयारी देखील जवळपास पूर्ण झाल्याचे समजते. निवडणूक आयोगाने 5 राज्यांना भेटी देऊन निवडणुकीची संभाव्य ब्ल्यू प्रिंट तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.राजस्थान, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात पाच राज्यांमध्ये मतदानाचे वेगवेगळे टप्पे होतील.

पाच राज्यांमध्ये 1 ते 2 टप्प्यात मतदान होणार असल्याचे समजते.मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि दोन्ही निवडणूक आयुक्तांच्या मान्यतेनंतर निवडणूक कार्यक्रमाला अंतिम मंजुरी दिली जाईल आणि त्यानंतर घोषणा होईल. 10 डिसेंम्बपच्या आसपास निकाल जाहीर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आता पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

राजकीय नेत्यांच्या प्रत्यक्ष लढाईला सुरुवात होणार आहे.सूत्रांच्या हवाल्याने, छत्तीसगडमध्ये दोन टप्यात मतदान होईल.मध्य प्रदेशात एका टप्प्यात मतदान शक्य आहे. मिझोराममध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.राजस्थानमध्ये एकाच टप्प्यात मतदान शक्य असल्याचं समजते. तेलंगणात एक टप्पात मतदान शक्य आहे. 10 ते 15 डिसेंबर दरम्यान मतमोजणी होईल. 10 डिसेंबरच्या आसपास निकाल लागेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -