Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगयूजर्ससाठी अमेझॉनने आणला एक खास प्लॅन लाँच

यूजर्ससाठी अमेझॉनने आणला एक खास प्लॅन लाँच



अमेझॉन प्राईम मेंबरशिप असणाऱ्या यूजर्सना शॉपिंग करताना विविध प्रकारचे फायदे मिळतात. फ्री शिपिंग, फास्ट डिलिव्हरी आणि एक्सक्लुझिव्ह ऑफर्स मिळतात. आजपासून (8 ऑक्टोबर) सुरू होणाऱ्या अमेझॉनच्या ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलचा अर्ली अ‍ॅक्सेस देखील प्राईम मेंबर्सना मिळाला आहे. मात्र, केवळ शॉपिंगसाठी प्राईम मेंबरशिप घेणं सर्वांनाच पटेल असं नाही.

त्यामुळेच अशा यूजर्ससाठी अमेझॉनने एक खास प्लॅन लाँच केला आहे. अमेझॉन शॉपिंग एडिशन असं या प्लॅनचं नाव आहे. यामध्ये 399 रुपयांमध्ये यूजर्सना एका वर्षाचं सबस्क्रिप्शन मिळणार आहे. यात यूजर्सना शॉपिंगवर फ्री-शिपिंग, वन-डे डिलिव्हरी असे अनेक फायदे मिळणार आहेत.

फ्लिपकार्टला दणका
फ्लिपकार्टने काही दिवसांपूर्वीच फ्लिपकार्ट व्हीआयपी नावाने एक असाच सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केला होता. मात्र याच्या वार्षिक सबस्क्रिप्शनची किंमत 499 रुपये एवढी आहे. आता अमेझॉनने त्याहून स्वस्तातला प्लॅन लाँच करुन फ्लिपकार्टला दणका दिला आहे.

अमेझॉन प्राईम मेंबरशिपची वार्षिक फी 1,499 रुपये एवढी आहे. काही वेळा डिस्काउंटवर ही मेंबरशिप 999 रुपयांना देखील मिळते. यामध्ये प्राईम व्हिडिओ, प्राईम म्युझिक, प्राईम म्युझिक आणि प्राईम गेमिंग अशा फीचर्सना अ‍ॅक्सेस दिला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -