Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरलोकसभेपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष आणि उमेदवार शोधावा लागेल; बावनकुळेंचा...

लोकसभेपर्यंत शरद पवार, उद्धव ठाकरेंना स्वतःचा पक्ष आणि उमेदवार शोधावा लागेल; बावनकुळेंचा विरोधकांवर निशाणा



देशात आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जनतेचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत आहे. स्थानिक पतळीवरील नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य महायुतीला पाठिंबा देत आहेत. लोकसभा निवडणुकीपर्यंत शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे यांना स्वतःचे पक्ष आणि उमेदवार शोधावे लागणार आहेत,’ अशी टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.कोल्हापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत ते (Chandrashekhar Bawankule) बोलत होते. ‘महाविजय २०२४’ अभियानअंतर्गत ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. बावनकुळे म्हणाले, ‘भारताचा अमृतकाळ सुरू झाला असून, यामध्ये देशाच्या प्रगतीची छबी जागतिक पटलावर उमटली आहे. देशाच्या विकासाचे धोरण आणि त्याची अंमलबजावणी यामुळे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आहे.याच गोष्टी लक्षात घेऊन देशाच्या पुनर्बांधणीमध्ये योगदान देण्यासाठी अजित पवार आणि त्यांना मानणारे राष्ट्रवादीचे नेते सरकारमध्ये सहभागी झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे तिघे गतीने निर्णय घेत आहेत. प्रत्येकाला विकासकामांसाठी निधी मिळत आहे. त्यामुळे स्थानिक नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य महायुतीला पाठिंबा देत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -