Friday, June 21, 2024
Homenewsतब्बल 68 वर्षांनंतर Tata Group ला मिळणार एअर इंडियाचा ताबा

तब्बल 68 वर्षांनंतर Tata Group ला मिळणार एअर इंडियाचा ताबाएअर इंडियाच्या (Air India) खासगीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. टाटा सन्स (Tata Sons) एअर इंडियाचे (Air India) नवे मालक असणार आहे. टाटा सन्सनं एअर इंडियाची लिलावात सर्वाधिक बोली लावली आहे. त्यामुळे एअर इंडियाच्या पॅनलकडून टाटा ग्रूपची निवड करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. एअर इंडिया आता पुन्हा एकदा टाटा समुहाच्या ताब्यात जाणार आहे. मात्र, टाटा सन्सकडून अद्याप याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही

एअर इंडियाच्या विक्रीसाठी स्थापन करण्यात आलेल्या सरकारी समितीनं टाटा समुहाच्या निविदेला मंजुरी दिली. त्यामुळे तब्बल 68 वर्षांनंतर एअर इंडिया ही कंपनी पुन्हा एकदा टाटा समुहाच्या ताब्यात जाणार आहे. जेआरडी टाटा (JRD Tata) यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाईन्स कंपनी (Tata Airlines Company) स्थापन केली होती. मात्र, सन 1953 मध्ये काँग्रेस सरकारच्या (Congress Government) काळात या कंपनीचे राष्ट्रीयकरण झालं होतं. त्यामुळे कंपनीचं नाव बदलून ‘एअर इंडिया’ (Air India) असं करण्यात आलं होतं. टाटा ग्रुप आणि स्पाइसजेट समुहानं एअर इंडियासाठी बोली लावल्याचं समजतं.

केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यात एअर इंडियाच्या अधिग्रहणासाठी टाटा समूह आणि स्पाइसजेटच्या संस्थापकाकडून प्राप्त झालेल्या आर्थिक बोलींचं मूल्यांकन करण्यात आलं. त्यात बेंचमार्कपेक्षा जास्त किंमत देणारी बोली स्वीकारली आली. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

भारतीय हवाई सेवेला संजिवनी मिळणार…
सन 2007 मध्ये देशांतर्गत विमान कंपनी इंडियन एअरलाइन्समध्ये विलीन झाल्यापासून एअर इंडिया तोट्यात आहे. आता एअर इंडिया टाटा समूहाच्या ताब्यात गेल्याने आता मरगळ आलेल्या भारतीय हवाई सेवेला संजिवनी मिळणार असं बोललं जात आहे. एअर इंडियाची विक्री हे केंद्र सरकारच्या खासगीकरण मोहिमेतील एक मोठे यश मानले जात आहे.

एअरलाइनसाठी यशस्वी बोली लावणाऱ्याला देशांतर्गत विमानतळांवर 4,500 देशांतर्गत आणि 1800 आंतरराष्ट्रीय लँडिंग आणि पार्किंग स्लॉट मिळणार आहे. त्याचबरोबर विमानतळांवर 900 स्लॉटचे नियंत्रण मिळेल.
कंपनीला एअरलाईनच्या कमी किमतीच्या सेवा एअर इंडिया एक्सप्रेसची 100 टक्के मालकी आणि AISATSची 50 टक्के मालकी मिळेल. AISATS प्रमुख भारतीय विमानतळांवर कार्गो आणि ग्राउंड हँडलिंग सेवा पुरवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -