Monday, April 22, 2024
Homenewsप्रीती झिंटाला मोठा धक्का, ख्रिस गेलनं सोडली पंजाब किंग्सची साथ!

प्रीती झिंटाला मोठा धक्का, ख्रिस गेलनं सोडली पंजाब किंग्सची साथ!


बॉलिवूड अभिनेत्री आणि इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL)क्रिकेट संघ पंजाब किग्सची (Punjab Kings) मालकीन संघ प्रीती झिंटाच्या (Preity Zinta) हिला मोठा धक्का बसला आहे. पंजाब किंग्सचा एक अनुभवी क्रिकेटपटू ख्रिस गेल (Chris gayle) याने मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे, ख्रिस गेलने संघाला रामराम ठोकला आहे. ख्रिस गेलच्या या निर्णयामुळे पंजाब किंग्सचं मोठं नुकसान होण्याची शक्यता असल्याची चर्चा क्रिकेटच्या वर्तुळात सुरू आहे

ख्रिस गेलनं ‘या’ कारणामुळे घेतला निर्णय
ख्रिस गेलनंनं टी -20 विश्वचषकावर (t20 world cup) लक्ष केंद्रीत केलं आहे. स्वतःला मानसिकरित्या तयार करण्यासाठी ख्रिस गेलने IPL 2021 चा मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाब किंग्सनं त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्वीट करत ख्रिस गेल यांने संघ सोडल्याची माहिती आहे.

हॉटेल आणि बायो बबलही सोडलं…
पंजाब किंग्जनं दिलेल्या माहितीनुसार, ख्रिस गेलनं पंजाब किंग्जचं हॉटेल आणि बायो बबल (bio bubble) सोडले आहे. त्यामुळे आता ख्रिस गेल उर्वरित सामन्यांमध्ये दिसणार नाही. विशेष म्हणजे, कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर IPL 2021 मधील उर्वरित सामने खेळवण्यात येत आहेत. त्यात ख्रिस गेल (chris gayle) बायो बबलचा एक भाग झाला होता. तो वेस्ट इंडिजसाठी, (west indies) दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला. मग सीपीएल आणि मग आयपीएलमध्ये तो खेळला.

काय म्हणाला ख्रिस गेल?
‘गेल्या काही महिन्यांत मी वेस्ट इंडिज, कॅरिबियन प्रीमियर लीग आणि नंतर आयपीएलच्या बायो-बबलचा एक भाग आहे. मात्र, मला स्वतः ला मानसिक रिफ्रेश करायचं आहे. मला टी -20 विश्वचषकात वेस्ट इंडिजला मदत करण्यावर पुन्हा लक्ष केंद्रीत करायचं आहे. मी दुबईतच असेल पण विश्रांती करणार आहे. पंजाब किंग्जचे आभार. माझ्या शुभेच्छा आणि आशा नेहमीच संघासोबत असतात.’, अशा शब्दात ख्रिस गेलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ढिसाळ कामगिरी… 10 सामन्यांत फक्त 193 धावा
IPL च्या 14 व्या हंगानात पंजाब किंग्जची ढिसाळ कामगिरी दिसून आली. ख्रिस गेलला देखील आपल्या संघासाठी विशेष असं काही करता आले नाही. ख्रिस गेल याने 10 सामन्यांत फक्त 193 धावांचं योगदान दिले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -