Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरKolhapur Breaking : दोन पोलीस कुटुंबांचा वाद रस्त्यावर! सुरा घेऊन पोलीसाची दहशत

Kolhapur Breaking : दोन पोलीस कुटुंबांचा वाद रस्त्यावर! सुरा घेऊन पोलीसाची दहशत

ताजी बातमी ऑनलाईन टीम

करवीर तालुक्यातील पाचगाव मधील गाडगीळ कॉलनी परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वाद थेट सुरा घेऊन दहशत वाजवण्यापर्यंत पोहोचला. या घटनेचा व्हिडियो सोशलमीडीयावर व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
करवीर तालुक्यातील पाचगाव हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे या गावात घडणाऱ्या घटना आणि गुन्ह्यांकडे पोलीस विभागाचे बारकाईने लक्ष असते. त्यातच आज पाचगावातील गाडगीळ कॉलनीतील एक व्हिडिओ बाहेर आल्याने पोलीस दलात एकच खळबळ माजली आहे.

या व्हिडिओत रात्री दोन कुटुंबात वाद झाल्याला दिसून येत
असून एक इसम सुरा घेऊन गल्लीमध्ये फिरताना दिसत आहे. दहशत वाजवणारा व्यक्ती आणि त्याची पत्नी हे पोलीस दलात आहेत. तर त्यांचा शेजारी राहणारा पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे. शेजारी राहणारा मुलगा आपल्या पत्नीकडे बघतो या संशयावरून पोलीस कर्मचाऱ्यांने थेट हातात सुरा घेऊन दहशत माजवली. याबाबतची तक्रार दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने करवीर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. चक्क पोलीसच घेऊन रस्त्यावर सुरा घेऊन फिरत असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहीला आहे. त्यामुळे पोलिसांवरच पोलीसांकडून काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -