Thursday, July 31, 2025
Homeब्रेकिंगदावे-प्रतिदावे, जोरदार युक्तिवाद आणि वकिलांमध्ये बाचाबाची, विधानसभा अध्यक्षांसमोर काय-काय घडलं?

दावे-प्रतिदावे, जोरदार युक्तिवाद आणि वकिलांमध्ये बाचाबाची, विधानसभा अध्यक्षांसमोर काय-काय घडलं?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज प्रत्यक्ष सुनावणी घेतली. यावेळी दोन्ही गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. यावेळी युक्तिवादादरम्यान दोन्ही गटाच्या वकिलांमध्ये बाचाबाची झाली. शिंदे गटाच्या वकिलांनी आज सर्व अपात्रतेच्या याचिकांवर पुरावे सादर करण्यासाठी 14 दिवसांचा वेळ मागितला. पण त्यांच्या या मागणीवर ठाकरे गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला. विशेष म्हणजे ठाकरे गटाच्या वकिलांनी विधानसभा अध्यक्षांना उद्देशून महत्त्वाचा युक्तिवाद केलाय.

शिंदे गटाच्या वकिलांनी सर्वात आधी युक्तिवादाला सुरुवात केली. त्यांनी जवळपास एक ते दीड तास युक्तिवाद केला. त्यानंतर ठाकरे गटाच्या वकिलांनी युक्तिवाद केला. “सर्व अपात्रता याचिकांवर पुराव्याची गरज नसल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार नव्याने पुरावे सादर करण्याची गरज नाही, असेही ठाकरे गट अर्जात बोलत आहेत. पण हे त्यांचं म्हणणं आहे. आम्हाला वाटतं, काही पुरावे सादर करण्याची गरज आहे. आम्हाला 14 दिवसांची मुदत द्या. आम्हाला काही पुरावे सादर करायचे आहेत”, अशी मागणी शिंदे गटाच्या वकिलांनी केली.

अपात्रता संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षाना’
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे वाचन शिंदे गटाच्या वकिलांनी केलं. अपात्रता संदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. पक्ष कोण आणि प्रतोद कोण हे पक्षाच्या घटनेनुसार चौकशी करून विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतली, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे, असं शिंदे गटाचे वकील म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाने येडियुरप्पा यांच्या संदर्भात दिलेल्या निकालाचा दाखला शिंदे गटाच्या वकिलांकडून देण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -