Wednesday, July 30, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची चाहूल

इचलकरंजी तसेच कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची चाहूल

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर जिल्हा तसेच इचलकरंजी शहरातही थंडीचे प्रमाण आता वाढायला सुरुवात झाली आहे सकाळच्या सुमारास डोक्याने भरलेले शहर आपल्याला दिसून येते तसेच थंडीची आपल्याला दिसून येत आहे तर शहरासह जिल्ह्यात दिवसभर उकाडा आणि रात्री थंडी सध्या जाणवू लागली आहे. शहरासह ग्रामीण भागातही रात्री थंडी सुरू झाली आहे.

ग्रामीण परिसरात काही भागात धुकेही पडू लागल्याचे चित्र आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या टप्प्यात उन्हाची तीव्रता कमी होत आहे. दिवसभर उन्हाचा तडाखा आणि रात्री थंडी पडत आहे. अचानक बदलणाऱ्या वातावरणाचा नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. रात्री थंडी सुरू झाल्याने स्वेटर, जॅकेटचा वापर वाढला आहे. ग्रामीण परिसरात काही भागात धुके पडू लागले आहे.

जिल्ह्यात पारा २० अंशापर्यंत खाली आला. गरुवारी २०.४ अंश इतक्या किमान तापमानाची नोंद झाली. येत्या दोन दिवसांत पारा १९ अंशांपर्यंत खाली जाईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -