ताजी बातमी ऑनलाईन टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र सदन कथित घोटाळ्याप्रकरणी समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह आणखी 4 जणांना कोर्टाने दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिलाय. तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर ही याचिका फेटाळण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचं देखील या प्रकरणात नाव आलं होतं. समीर भुजबळ हे छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. तर पंकज भुजबळ हे छगन भुजबळ यांचे चिरंजीव आहेत. या प्रकरणावर सातत्याने चर्चा होत असते. याप्रकरणावर कोर्टात आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. पण न्यायमूर्तींनी आज याचिकाच फेटाळल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्यासह सत्यन केसरकर, संजय जोशी, तन्वीर शेख, राजेश धारप अशी इतर 4 आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विशेष पीएमएलए कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करावी, अशी प्रमुख मागणी याचिकेत करण्यात आली होती. पण कोर्टाने हीच याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता समीर भुजबळ यांना मुंबई हायकोर्टात दाद मागावी लागणार आहे.
आम्ही हायकोर्टात अपील करणार’
याप्रकरणी ईडीने छगन भुजबळ यांच्यासह 52 आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. महाराष्ट्र सदन कथित घोटाळा, एसीबी प्रकरणात दिलासा मिळाल्यानं ईडीने दाखल गुन्हा रद्द करावं, अशी 6 आरोपींची मागणी आहे. याप्रकरणी तब्बल एक वर्षांपासून सुनावणी सुरु होती. मात्र न्यायाधीश राहुल रोकडे यांनी तांत्रिक मुद्द्यांवरुन याचिका फेटाळली आहे. त्यानंतर आता आदेशाची प्रत मिळाल्यानंतर आम्ही हायकोर्टात अपील करणार, असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं आहे.
मोठी बातमी, समीर भुजबळ आणि पंकज भुजबळ यांना कोर्टाचा दणका, थेट याचिकाच फेटाळली
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -