Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरKolhapur: शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा गळा आवळून खून

Kolhapur: शेतात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या महिलेचा गळा आवळून खून

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पेठवडगाव : घुणकी (ता. हातकणंगले) येथे शेतात जनावरे
चारण्यासाठी गेलेल्या सुषमा अशोक जाधव (वय ३८) या महिलेचा गळा आवळून खून झाल्याचे उघडकीस आले. काल, गुरुवार सकाळपासून सुषमा जाधव बेपत्ता होती. याबाबत वडगाव पोलिसात नोंद झाली होती. काल रात्री पासून शोधाशोध सुरू होती. दरम्यान आज त्यांचा मृतदेह मिळून आला. घटनास्थळी वडगाव पोलीस व पोलिस निरीक्षक भैरव तळेकर यांनी धाव घेतली.

सुषमा जाधव या शेतात जनावरे चारण्यासाठी घेऊन जात होत्या. काल (गुरुवारी) सकाळी त्या जनावरे घेऊन सकाळी घुणकी गावच्या उत्तरेस वारणा नदीच्या बाजूला असणाऱ्या ‘डाग’ नावाच्या भागात गेल्या होत्या. त्या घरी परत न आल्यामुळे कुटुंबियांनी शोधाशोध केली. याबाबत त्यांना धमकी दिली होती. या पार्श्वभूमीवर आज सकाळी त्यांचा मृतदेह उसाच्या फडात आढळला.

पोलीस पाटील संदीप तेली यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. खुनाचे
नेमके कारण काय याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. तपासासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -