सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त झालेल्या मॅरेथॉन स्पर्धेत पोलिस व पोलिस कुटुंबीय सहभागी झाले होते.तंदुरुस्तीसाठी धावले पोलिस, अधिकारी आणि कुटुंबीय… ‘अकादमी’च्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते.तंदरुस्तीसाठी आज जिल्हा पोलिस दलातील ४८ अधिकारी व ६०३ पोलिस अंमलदारांसह काही पोलिस कुटुंबीय मॅरेथॉनमध्ये धावले. सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलिस अकादमीच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त भारतामध्ये पोलिस अधिकारी, अंमलदार व त्यांचे कुटुंबियाकरीता मॅरेथॉनचे आयोजन केले होते. तंदरुस्त राहणे हा या मॅरेथॉनचा उद्देश होता. अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिरवा झेंडा दाखवून मॅरेथॉनला सुरवात केली. सकाळी १५ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन येथील पोलिस मुख्यालयातून सुरू झाली. पोलिस परेड ग्राऊंड, पितळी गणपती, रामचंद्र पंत अमात्य चौक, शासकीय विश्राम गृह, सेवा रुग्णालय ते परत पोलिस परेड ग्राऊंड अशी पाच किमी अंतराची मॅरेथॉन होती. मॅरेथॉनचे आयोजन अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. पोलिस उपअधीक्षक (गृह) सुवर्णां पत्की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, जिल्हा विशेष शाखा, पोलिस कल्याण विभाग, पोलिस मुख्यालय, बिनतारी संदेश विभाग, पोलिस बॅण्ड पथकातील अधिकारी व अंमलदारांनी संयोजन केले.——चौकटविजेते असेमॅरेथॉनमध्ये मिनाताई देसाई (पोलिस मुख्यालय), कडूबा रतन जाधव (शिरोळ पोलिस ठाणे), सुरेश राजेंद्र पाटील (आयआरबी दल), संभाजी मारुती हातरूळ (लोहमार्ग मिरज) आणि बबन धानू लांबोरे (चंदगड पोलिस ठाणे) यांना अनुक्रमे क्रमांक मिळाले. पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार (कागल पोलीस ठाणे) हे अधिकारी गटात, तर पोलिस कुटुंबियांतून स्वप्निल नामदेव यादव हे पहिले आले. सर्वांना अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -