ताजी बातमी ऑनलाईन टीम
कबनूरमध्ये फुलेनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकाम साईटवरुन तोल जावून खाली पडल्याने अनिल बाबुराव दिंडे (रा. परीट गल्ली कबनूर) या बांधकाम कामगाराचा मृत्यू झाला. रविवारी दुपारच्या सुमारास सदरची घटना घडली.
याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात नोंद झाली आहे. याबाबत माहिती अशी कि, कबनूर येथील बांधकाम साईटवर अनिल दिंडे काम करत होते. तेव्हा सिमेंटचा माल बुट्टीत भरुन जात असताना तोल जावून उंचावरुन ते खाली पडले. त्यामध्ये डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना तातडीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत दिपक रमेश सुतार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास स.फौ. सीमा डोंगरे करत आहेत.