ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी मध्ये आता मराठा आरक्षण याचे वातावरण पसरत असल्याने त्यातच आता मोठी खळबळ पसरली आहे ती म्हणजे महिलेवर बलात्कार करुन तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी रियाज इमाम कुचनूर ( वय ४३ रा. कारंडे मळा शहापूर) याचेवर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पिडीत महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. पिडीत महिला सन २०१४ मध्ये कामावरुन घरी परतत होत्या. भोनेमाळ परिसरात संशयित रियाज कुचनूर याने तिला अडविले.
जबरदस्तीने मोटरसायकलीवर बसवून महिलेला त्याच्या घरासह पट्टणकोडोली, कोल्हापूर व जयसिंगपूर येथील लॉजवर नेऊन बलात्कार केला. तसेच २७ ऑक्टोबर अखेर वारंवार पाठलाग करत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली, तसेच २७ ऑक्टोबर रोजी पिडीत महिला घरी जात असताना भोनेमाळ परिसरात संशयित कु चनुरे याने पुन्हा मोटरसायकलवरुन येऊन अडवत जबरदस्तीने मोटरसायकलवर बसवून नेत असताना पिडीतेने विरोध केला. त्यावेळी संशयिताने अश्लिल भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली असे फिर्यादीत नमुद केले आहे.