Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनउर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके फॅशन करणं आले अंगलट

उर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके फॅशन करणं आले अंगलट

उर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके फॅशन करणं आले अंगलट

उर्फी जावेदसाठी, तिच्या फॅशन निवडीबद्दल ट्रोल आणि लक्ष्य बनणे ही नवीन सामान्य गोष्ट झाली आहे. ही अभिनेत्री तिच्या विचित्र आणि सर्जनशील पोशाखांसाठी ओळखली जाते. अलीकडेच, Uorfi ने हॅलोविनसाठी ‘भूल भुलैया’ या चित्रपटातील राजपाल यादवचा लूक पुन्हा तयार केला. मात्र, त्यासाठी तिला जीवे मारण्याच्या धमक्याही मिळाल्या. ‘बिग बॉस OTT’ फेम अभिनेत्रीने तिला प्राप्त झालेल्या ईमेलचे स्क्रीनशॉट शेअर करण्यासाठी तिच्या X (पूर्वीचे ट्विटर) खाते घेतले.

 

इन्स्टाग्रावर शेअर केलेला व्हिडीओ डिलीट कर, अन्यथा जीवे मारू, असा धमकीचा ई-मेल उर्फी जावेदला एका अज्ञात व्यक्तीकडून आला आहे. उर्फीने स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. जर ती व्हिडीओ डिलीट केली नाही तर तिला जीवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली आहे.

 

अभिनेत्री आपल्या ट्वीटमध्ये म्हणते, “या देशामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे मला धक्का बसला आहे. मी चित्रपटातले एक पात्र पुन्हा साकारल्यामुळे मला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.” सोबतच पुढे तिने मेलचे स्क्रिनशॉट सुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर केले आहेत.

 

तिला पहिला मेल निखिल गोस्वामी या नावाने आला आहे. “तु जो व्हिडीओ अपलोड केला आहे, तो व्हिडीओ तू डिलीट नाही केला तर अन्यथा तुला जिवे मारायला वेळ लागणार नाही.” असा आशय त्या मेलमध्ये आहे. तर दुसरा मेल रुपेश कुमार नावाने तिला आला आहे. “उर्फी तू आमच्या हिंदू धर्माची बदनामी करतेय. तुझं आयुष्य चांगल्यापद्धतीने जग नाहीतर अवघड होईल. कोणीही तुला वाचवायला येणार नाही.” तर असा आशय दुसऱ्या मेलमध्ये आहे.

 

राजपाल यादवने ‘भूल भुलैया’ चित्रपटामध्ये एका पंडिताचे पात्र साकारले होते. अगदी सेम टू सेम तसाच गेटअप तिने केला आहे. खरंतर तो गेटअप तिने हॅलोविन पार्टीसाठी केला होता. व्हिडीओमध्ये उर्फीने, लाल रंगाचं फुल स्लीव्हज असलेला बॉडी फिट टॉप घातला आहे.

 

तर त्याखाली भगव्या रंगाचं धोतर घातलं आहे. गळ्यात झेंडूच्या फुलांचा हार, केसामध्ये पेटती अगरबत्ती लावली आहे. या सगळ्यामध्ये, उर्फीचा चेहरा फारच विनोदी दिसतोय. तिने संपूर्ण चेहऱ्याला लाल रंग लावला आहे. भुवया देखील डार्क केल्या आहेत आणि अगदी छोट्या- छोट्या मिश्याही लावल्या आहेत.

 

राजपाल यादवच्या लूकपेक्षा जास्त विनोदी दिसत आहे. उर्फीने तो उत्तमरीत्या कॅरी देखील केला आहे. पण आता हाच लूक तिच्या अंगलट आला आहे. उर्फी नेहमीच आपल्या विचित्र आणि भन्नाट लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेते. खरंतर ती या आधी सुद्धा आपल्या लूकमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -