Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगब्रेकिंग ! नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार 'हे' मोठे आर्थिक लाभ,...

ब्रेकिंग ! नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हे’ मोठे आर्थिक लाभ, पगारात होणार मोठी वाढ

ब्रेकिंग ! नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार ‘हे’ मोठे आर्थिक लाभ, पगारात होणार मोठी वाढ

 

देशात नुकत्याच काही दिवसांपूर्वी नवरात्र उत्सवाचा पवित्र सण साजरा झाला आहे. येत्या 12 दिवसात आता देशात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. 12 नोव्हेंबरपासून यंदा दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे.

12 नोव्हेंबर रोजी दीपावली नरक चतुर्दशी, लक्ष्मी कुबेर पूजन राहील.

 

14 नोव्हेंबर रोजी दीपावली पाडवा, बलीप्रतिपदा साजरा केला जाणारा आहे आणि 15 नोव्हेंबर रोजी भाऊबीज सण साजरा होणार आहे. दरम्यान, यंदाच्या दिवाळीत राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. राज्य कर्मचाऱ्यांना दोन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत.

 

जसं की आपणास ठाऊकच आहे की, नुकत्याच काही दिवसांपूर्वी साजरा झालेल्या नवरात्र उत्सवात केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला आहे. महागाई भत्ता 4% वाढविण्यात आला आहे. म्हणजेच महागाई भत्ता 46% झाला आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46% झाला असून ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे.

 

म्हणजेच संबंधितांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्ता थकबाकी देखील दिली जाणार आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात देखील वाढ करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

 

27 ऑक्टोबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने याबाबतचा निर्णय घेतला आहे. सदर निर्णयानुसार अखिल भारतीय सेवेत कार्यरत असलेला अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 46 टक्के करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना देखील जुलै महिन्यापासून ही वाढ लागू राहणार असून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांचीमहागाई भत्ता थकबाकी देखील त्यांना दिली जाणार आहे.

 

विशेष म्हणजे याचा रोखीने लाभ या चालू महिन्याच्या वेतना सोबत म्हणजेच जे वेतन नोव्हेंबर महिन्यात कर्मचाऱ्यांच्या हातात पडेल त्या वेतनासोबत दिला जाणार आहे. दिवाळी सणाच्या पूर्वीच या कर्मचाऱ्यांच्या हातात पैसा येणार आहे. यामुळे संबंधितांची दिवाळी गोड होईल असा आशावाद व्यक्त होत आहे.

 

अशातच आता राज्यातील 17 लाख राज्य कर्मचाऱ्यांना देखील महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. राज्य शासनाच्या वित्त विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला असून हा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंजूर केला जाईल असे सांगितले जात आहे.

 

सध्या राज्य कर्मचाऱ्यांना 42 टक्के एवढा महागाई भत्ता मिळत असून यामध्ये केंद्र शासनाच्या धर्तीवर 4% वाढ होणे अपेक्षित असून हा महागाई भत्ता 46 टक्के एवढा केला जाणार आहे. ही वाढ जुलै महिन्यापासून लागू केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय मात्र पुढील महिन्यात होण्याची शक्यता आहे.

 

दिवाळीच्या काळातच याबाबतचा निर्णय घेतला जाऊ शकतो असा दावा केला जात आहे. यामुळे नोव्हेंबर महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे डिसेंबर महिन्यात जे वेतन कर्मचाऱ्यांच्या हातात पडेल त्या वेतनासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा लाभ दिला जाणार आहे. याशिवाय, राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी यामुळे त्यांना दिवाळीपूर्वीच वेतन वितरित करण्याच्या सूचना शासनाच्या माध्यमातून जारी झाल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -