ताजी बातमी ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला असून, ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिसंक वळण लागलं आहे. सोमवारी बीड जिल्ह्यात जाळपोळीच्या घटना घडल्या. यानंतर गृहविभागाने जाळपोळ करणाऱ्यांवर ३०७ चे कलम लावण्याचा इशारा दिला.
यानंतर जरांगे पाटलांनी माध्यमांशी बोलताना तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी स्वत: बीडमध्ये जाईल आणि एसपी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसेल, असा थेट इशारा दिला. तसेच “राज्य सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, अर्धवट प्रमाणपत्र सरकारने वाटू नये, आम्ही अर्धवट प्रमाणपत्र घेणार नाहीत, त्यामुळे आज निर्णय घेतला नाही, तर बुधवारपासून मी जलत्याग करणार असून सरकारने विशेष अधिवेशन बोलावं”, असेही जरांगे पाटील म्हणाले.
आमचे आंदोलन शांततेत सुरु आहे. आम्हाला त्रास देऊ नये. बीडमध्ये आमचे आंदोलन सुरु आहे, त्यानंतर तुमची संचारबंदी आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला त्रास देऊ नका, दिला तर पुढे काय होईल याची जबाबदारी तुमची. तरुणावर खोटे गुन्हे दाखल करु नका. तरुणांवर गुन्हे दाखल झाले तर मी बीडमध्ये जाईल, मग १० लाख मराठा समाज येईल, हे सांगता येत नाही. मग मराठा समाजाची ताकद समजेल, असेही जरांगे पाटील म्हणाले.
दरम्यान, यावेळी जरांगे पाटील यांनी नाव न घेता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार टीका केली. एका उपमुख्यमंत्र्यांना काड्या करायची सवय आहे, पण मराठा आंदोलकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जशासतसं उत्तर दिले जाईल, तसेच सरकारला ताणायचं असेल तर आम्हीही दाखवूच, उद्यापासून साखळी उपोषण, आमरण उपोषण आणि गावबंदी अशी त्रिसूत्री असणार आहे, असेही जरांगे पाटलांनी सांगितले.
‘सरकारचा एकही निर्णय मान्य नाही, आंदोलकांना त्रास देऊ नका अन्यथा…’; जरांगे पाटलांचा इशारा
RELATED ARTICLES
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -