ताजी बातमी ऑनलाईन टीम
उद्याच्या उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवण्याची घोषणा करुन महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीला राज्याचा दर्जा देऊन तोच प्रथम अहवाल तयार करुन त्याच अधारे महाराष्ट्राच्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावेत. जर तुम्ही मराठा आरक्षणाबाबत उद्यापर्यंत ठोस निर्णय घेतला नाही तर उद्या संध्याकाळपासून मी पुन्हा पाणी बंद करणार आहे.
या सर्वांना जबाबदार सरकार राहणार, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय. महाराष्ट्र शांत आहे. सरकारला महाराष्ट्र शांत राहू द्यायचा नाही, असा सरकारचा अंदाज आहे. त्याला आम्ही काही करु शकत नाही, असेही ते म्हणाले. पुढे मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर भाष्य करताना जरांगे म्हणाले, मी सकाळी स्पष्ट सांगितलं होतं की, तुम्ही निर्णय घेताना सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावेत म्हणून निर्णय घ्या. माझ्या माहितीप्रमाणे तसा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे अर्धवट प्रमाणपत्र मराठा समाज घेणारही नाही. संबंधित अधिकाऱ्याने ते वाटूसुद्धा नये. तुम्हाला ते वाटू दिले जाणार नाहीत.