ताजी बातमी ऑनलाईन टीम
बांगलादेशविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवून पाकिस्तानने स्पर्धेत स्वतःचे आव्हान जिवंत ठेवले आहे. या पराभवानंतर बांगलादेश विश्वचषकातून बाहेर पडला. वन-डे वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडणारा तो पहिला संघ ठरला.
बांगलादेशचे सात सामन्यांत केवळ दोन गुण आहेत. उर्वरित दोन सामने जिंकूनही त्याचे केवळ सहा गुण होतील. दुसरीकडे, पाकिस्तानचे आता सात सामन्यांत सहा गुण झाले आहेत. त्याचे उर्वरित दोन्ही सामने जिंकल्यास ते उपांत्य फेरीत प्रवेश शकतो.