ताजी बातमी ऑनलाईन टीम
सांगली : मराठा आरक्षणाच्या मागणीला सांगली जिल्ह्यातही जोर वाढला आहे. जिल्ह्यातील विविध गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी घालण्यात आली आहे. आता शहरातही राजकीय नेत्यांना वार्डबंदी करण्यात आली. कोल्हापूर रोड परिसरातील शामरावनगर वार्डात मराठा समाजाच्यावतीने वार्डबंदीचा निर्णय घेण्यात आला.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे सुरू ‘असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे. कर्नाळ, बेडग, कसबेडिग्रज, मालगावसह जिल्ह्यातील अनेक गावात राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे. गावागावात उपोषण आंदोलने सुरू आहेत. त्यातच आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा वणवा शहरातही पसरू लागला आहे. कोल्हापूर रोडवरील शामरावनगरमधील प्रभाग १८ मधील मराठा बांधवांनी एकत्र येत वार्डबंदीचा निर्णय घेतला आहे.
गावबंदीनंतर आता सांगली शहरात वार्डबंदी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -