Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगमराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

मराठा आंदोलनाची धग मंत्रालयापर्यंत; मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड

मराठा आरक्षणाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. मंत्रालय परिसरात असणाऱ्या आमदार निवास परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. मराठा आंदोलकांनी ही तोडफोड केल्याची माहिती आहे.

 

छत्रपती संभाजीनगर इथून आलेल्या अजय साळुंखे, संतोष निकम, दीपक सहानकोरे या तिघांनी आमदार निवासस्थानी असलेल्या मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड केली.मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांची चौकशी केली जात आहे.

 

हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची घटना समोर येता कोल्हापूर पोलीस सतर्क झाले आहेत. मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -