Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगसदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक

सदाभाऊ खोत, सदावर्ते, राणे यांच्या फोटोला चप्पलने झोडपले; विट्यात मराठा आंदोलक आक्रमक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

विटा (सांगली) : मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी विटा येथे सुरू असलेल्या साखळी उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आज, बुधवारी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या तसेच मराठा समाजाबद्दल बैताल वक्तव्य करणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते, केंद्रीय मंत्री नारायण राणे, रामदास कदम, सदाभाऊ खोत, छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास चप्पलने झोडून काढले. त्यानंतर या पुतळ्याची अंत्ययात्रा काढून चौकातच त्याचे आंदोलकांनी दहन केले.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या समर्थनासाठी मराठा कृती समितीचे प्रमुख शंकर मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून विटा येथे साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -