Friday, May 9, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत जेष्ठ नागरीक ठार

इचलकरंजी ; दोन दुचाकीच्या समोरासमोरील धडकेत जेष्ठ नागरीक ठार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शहापूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्यावरील म्हाडा कॉलनी जवळ दोन दुचाकीची समोरासमोर धड़क झाली. यामध्ये एका दुचाकीवरील वयोवृद्ध दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. त्याला शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. आशफाक आलम शाहबतुल्लाह शेख (वय 62, रा. बालाजीनगर, शहापूर, ता. हातकणगले ) असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी शहापुर पोलीस ठाण्यात राहुल पाथरवट ( रा. कारंडेमळा, शहापूर, ता.हातकणंगले ) या संशयीत दुचाकीस्वाराविरोधी गुन्हा दाखल झाला आहे.

संशयीत दुचाकीस्वार राहुल पाथरवट हा आपल्या अन्य दोघा मित्राना दुचाकीवर बसवून भरधाव वेगाने जात होता. यावेळी त्याच्या दुचाकीची शहापूरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रस्त्यावरील म्हाडा कॉलनी नजीक समोरुन येणाऱ्या आशफाक आलम शाहबतुल्लाह शेख यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेने ते गंभीर जखमी झाले. त्याना त्वरीत शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. या विषयी त्यांचा मुलगा फहीम मोहमंद अशफाक आलम शेख यांने पोलिसात फिर्याद दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -