ताजी बातमी ऑनलाईन टीम
इचलकरंजी महानगरपालिकेच्या दूरवस्था झालेल्या सार्वजनिक शौचालयाचा स्लॅबचा भाग अंगावर पडून एकजण जखमी झाला. जखमीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून या घटनेबद्दल भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडी शहराध्यक्षा पूनम जाधव यांनी उपायुक्त तैमूर मुल्लाणी यांच्याकडे करत शौचालयाची तात्काळ दुरुस्ती करून देण्यासह जखमीच्या औषधोपचाराचा खर्च महापालिकेने करावा अशी मागणी केली आहे.
प्रभाग क्र ४. कृष्णानगर भागातील सार्वजनिक शौचालयाची दूरवस्था झाली असून त्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. सार्वजनिक शौचालयाच्या भींती व स्लॅब पडू लागला आहे. त्यामुळे नागरिकांचा जीवाला धोका निर्माण झाला आहे. एका शौचालयातील स्लॅब थेट नागरिकाच्या अंगावर पडल्याने तो जखमी झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या परिसरात महापालिकेच्या कार्य पध्दतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्वछता अभियानात अव्वल येण्याचे प्रयत्न करणार्या इचलकरंजी महापालिकेला हा कारभार अशोभनीय असून अशा विषयाकडे गांभीर्याने पाहावे व नवीन शौचालय बांधून द्यावे, अशी मागणी आहे.
इचलकरंजी ; शौचालयाचा स्लॅब अंगावर पडून एकजण जखमी औषधोपचाराचा खर्च महानगरपालिकेने करावा मागणी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -