Wednesday, July 30, 2025
Homeकोल्हापूरयुवतीची गळफास घेवून आत्महत्या

युवतीची गळफास घेवून आत्महत्या


ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर; नाळे कॉलनी परिसरातील सिद्धी किरण पाटील (वय १८) या युवतीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. नातेवाईकांनी फास सोडवून तिला बेशुद्धावस्थेत सीपीआरमध्ये आणले. मात्र,
उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद जुना राजवाडा पोलिसांत झाली.

दुसऱ्या घटनेत कनाननगरात भांडण सोडविण्यास गेलेल्या प्रकाश मनोहर तौर (वय ३६) याच्यावर एडक्याने हल्ला करण्यात आला. पाठीवर आणि डोक्यावर वार करण्यात आले असून आठ टाके पडले आहेत. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास अण्णाभाऊ साठे चौकात तीन ते चार जणांनी त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -