देशात दिवसेंदिवस महगाई वाढत चालली आहे, आधी टोमेटोनंतर आता कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे देशातील नागरिकांना वाईट दिवस बघावे लागत आहेत. आपण अनेक जण मध्यमवर्गीय आणि सध्या परिवारांचा भाग आहोत त्यामुळे अशी वाढणारी महागाई आपल्याला परवडणारी नाही. टोमॅटो किंवा कांदा हा आपल्या आहारातला एक महत्वपूर्ण घटक आहे.
त्यातच आता सणासुदीच्या काळात कांद्याचे दर वाढले आहेत. आपल्या घरात बनणारे अनेक पदार्थ यांवर अवलंबून असतात आणि अश्या परिस्थितीत जर का या किमती अश्याच वाढत गेल्या तर येणारा काळ भरपूर कठीण ठरू शकतो.
हे दिवस सणांचे आहे, आनंदाचे आहेत. मात्र अश्यावेळी कांद्याच्या वाढत्या किमतींमुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना आर्थिक तणावाचा सामना करावा लागणार आहे. मागच्या आठवड्यात कांद्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत, काही दिवस आधी 30-35kg प्रती किलो होता जो कि आता 60 ते 80 रुपये प्रती किलो झाला आहे. काही दिवसांपूर्वी आपण टोमेटोच्या वाढत्या किमतींमुळे त्रस्त होतो आणि आता पुन्हा एकदा कांद्यामुळे (Onion Price Hike) डोळ्यात पाणी येण्याची वेळ आली आहे. काही तज्ञांच्या माते या किमतींमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
कांद्याच्या किमती वाढायला जर का कुणी सर्वात जबाबदार असेल तर ते म्हणजे वातावरण आणि त्यात होणारे बदल. काही ठिकाणी भरपूर पाऊस पडला आणि काही ठिकाणी मात्र पाऊसाचा जोर कधीच दिसला नाही, त्यामुळे कांद्याच्या पिकावर वाईट परिणाम झाला. आणि आता कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे याची आयात महागली आहे. या वाढत्या किमती लक्ष्यात घेत अनेक हॉटेल्स आणि ढाबेवाल्यांनी खर्च वाचवण्यासाठी आपल्या पदार्थांमधून कांदा बाजूला केला आहे.