रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाची सुस्साट घोडदौड सुरुच आहे. टीम इंडियाने आयसीसी वनडे वर्ल्ड कपमधील आपल्या सातव्या सामन्यातही विजय मिळवलाय. टीम इंडियाने 302 धावांनी श्रीलंकेचं लंकादहन केलंय. टीम इंडियाने श्रीलंकेवर विजय मिळवत सेमी फायनलचं तिकीट कन्फर्म केलंय. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 358 धावांचं आव्हान दिलं होतं.
मात्र श्रीलंकाने मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजच्या धारदार बॉलिंगसमोर शरणागती पत्कारली. टीम इंडियाने श्रीलंकाचा बाजार हा 19.4 ओव्हरमध्ये 55 धावांवर आटोपला. टीम इंडियाने यासह वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका विरुद्ध विजयी हॅटट्रिक पूर्ण केली. टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हन | रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.