Thursday, February 6, 2025
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईची मागणी पोलीस अधिक्षकांना निवेदन

इचलकरंजी ; फसवणूक केल्याप्रकरणी कारवाईची मागणी पोलीस अधिक्षकांना निवेदन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कर्जप्रकरण करून देतो असे सांगून घेतलेल्या कागदपत्रांची स्वत:च्या कर्ज प्रकरणासाठी माझी परवानगी न घेता वापरून फसवणूक केल्याप्रकरणी प्रकाश कांतीलाल रानभरे (रा. पाटील मळा, तारदाळ) याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पोलीस अधिक्षक अप्पर पोलीस अधिक्षक व शहापूर पोलीस ठाणे यांचेकडे निवेदनाव्दारे सौ. जयश्री मनोज म्हेत्रे (रा. समर्थनगर तारदाळ यांनी केली आहे.

दिलेल्या तक्रारी अर्जात आपण राहत असलेल्या भागात प्रकाश रानभरे राहतात. माझ्या बहिणीचे ते पती आहेत. सन २०१८ मध्ये प्रकाश रानभरे याने कर्जप्रकरण मंजूर करून देतो असे सांगून माझ्याकडून आधार कार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, फोटो अशी कागदपत्रांची झेरॉक्स घेतली. कागदपत्रे घेतल्यानंतर काही महिन्यांनी मला मेसेज आला.

आपले कर्जप्रकरण थकीत आहे. याबाबत चौकशी केली असता प्रकाश रानभरे यांनी फायनान्स कंपनीकडून १५ लाख कर्ज घेतले व आपणास जामीनदार केले असल्याचे समजले. आपली फसवणूक केल्याचे समजताच प्रकाश रानभरे याला भेटले असता कर्जप्रकरण केले असल्याचे सांगितले तसेच आपणास कर्जांची आवश्यकता भासली असता तुमचे सीबील खराब असे सांगून कर्जप्रकरण मंजूर केले नाही. याबाबत विचारणा केली असता आपणास फोनवरून शिवीगाळ करून धमकीही दिली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -