Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगप्रभासच्या ‘सालार’चा क्रिसमसलाच धमाका? या कारणामुळे निर्मात्यांचा ‘त्या’ तारखेवर जोर

प्रभासच्या ‘सालार’चा क्रिसमसलाच धमाका? या कारणामुळे निर्मात्यांचा ‘त्या’ तारखेवर जोर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

डंकी आणि सालार हे दोन्ही चित्रपट सध्या तूफान चर्चेत आहेत. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज होणार असल्याची तूफान चर्चा आहे. दोन्ही चित्रपटाचे निर्माते एक पाऊल मागे घेण्यात तयार नाहीत. यामुळेच आता नेमक्या कोणत्या चित्रपटाला याचा फटका हा बसतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. शाहरूख खान याचा डंकी आणि प्रभास याचा सालार हे चित्रपट क्रिसमसच्या दिवशीच रिलीज होणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगितले जातंय.

दोन्ही चित्रपट एकाच दिवशी रिलीज झाल्याने फटका बसणार हे नक्की आहे. मध्यंतरी चर्चा होती की, सालार चित्रपटाच्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत चित्रपटाची रिलीज डेट बदलली आहे. मात्र, आता हे स्पष्ट झालंय की, सालार हा चित्रपट क्रिसमसच्याच आठवड्यात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. डंकी देखील याच वेळी रिलीज केला जाईल.

सालार हा चित्रपट क्रिसमसला रिलीज करण्याचे एक अत्यंत मोठे कारण आहे. पाच वर्षांपूर्वी केजीएफ 1 चित्रपट हा क्रिसमसच्या आठवड्यात रिलीज केला होता. विशेष म्हणजे या चित्रपटाला मोठा प्रतिसाद हा प्रेक्षकांकडून मिळाला. यामुळे निर्मात्यांना वाटते की, याच आठवड्यामध्ये प्रेक्षक हे चित्रपटांचा आनंद जास्त घेतात आणि तोच योग्य वेळ आहे.

मुळात म्हणजे निर्मात्यांना सालार या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहे. या वर्षीचा सर्वाधिक कमाई करणारा हाच चित्रपट ठरू शकतो. प्रभास याचा काही दिवसांपूर्वी रिलीज झालेला आदिपुरूष हा चित्रपट फ्लाॅप गेलाय. यामुळे हा चित्रपट काय धमाका करतो याकडे सर्वांच्या नजरा आहेत. प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत.

दुसरीकडे शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाकडून देखील मोठ्या अपेक्षा या नक्कीच आहेत. शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे शाहरुख खान याच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा प्रचंड असा प्रतिसाद हा मिळताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच शाहरुख खान याचा जवान हा चित्रपट रिलीज झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -