Monday, December 23, 2024
Homeब्रेकिंगमहायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा

महायुती लोकसभेच्या किती जागा जिंकणार?; मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदाच सांगितला आकडा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बैठका, मेळावे आणि संवादावर भर देण्यास सुरुवात केली आहे. काही राजकीय पक्षांनी आंदोलने करून मतदारांचे लक्ष वेधण्याचं काम सुरू आहे. तसेच निवडणुकीच्या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोपप्रत्यारोपही केले जात आहेत. तसेच किती जागा जिंकणार याचा दावाही केला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळतील याचा आकडाच सांगितला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच हा आकडा सांगितला आहे.

काल आमची महायुतीची बैठक झाली. त्यात समन्वय समिती ठरली. तिन्ही पक्षात समन्वय साधण्यावर चर्चा झाली. जिल्हा, तालुकास्तरावर महायुतीचे सर्व कार्यकर्ते एक दिलाने काम करतील, असं या बैठकीत ठरलं. लोकसभेच्या निवडणुकीत राज्याने केलेलं काम आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतील 8 वर्षाच्या कामाचं मोजमाप लोकं करतील. मतदार विरोधकांना प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राज्यात आमच्या 45 जागा निवडून आल्याशिवाय राहणार नाही, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

आम्ही काम करतोय
यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावरही टीका केली. आम्ही काम करतो. विरोधकांना काही कामधंदा राहिला का? रोज आरोप करणं हेच विरोधकांचं काम आहे. आम्ही कामातून उत्तर देत आहोत. काम करत आहोत. त्यांनी बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू करतोय. इगो ठेवून त्यांनी कामं बंद पाडलेली. असे राज्यकर्ते नसतात. अंहकारी वृत्तीने राज्य चालत नाही. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आम्ही आमचं का करतो. त्यांना रोज सकाळी उठल्यावर तेवढंच काम आहे. आम्ही सकाळी उठून काम करतोय. प्रकल्प पुढे नेत आहोत. तुम्ही हे सर्व पाहात आहात, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -