Saturday, March 15, 2025
Homeब्रेकिंगराज्यात 2 हजार 500 ग्रामपंचायती आणि 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान; उद्या...

राज्यात 2 हजार 500 ग्रामपंचायती आणि 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान; उद्या निकाल

राज्यात 2 हजार 500 ग्रामपंचायती आणि 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान; उद्या निकाल

महाराष्ट्रातील लोकसभा आणि निवडणुकीची आज पहिली झलक आज पाहायला मिळणार आहे. कारण राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. आज या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडतेय. राज्यातील 2 हजार 500 ग्रामपंचायतींसाठी पोटनिवडणूक होतेय. 130 रिक्त सरपंचपदासाठी आज मतदान होतंय. तर या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निडणुकीची झलक या ग्रामपंचायत निवडणुकीचत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. आज नागरिकांची मतं आज मतपेटीत बंद होतील. तर उद्या निकाल सर्वांसमोर असेल.

 

विदर्भात आज ग्रामपंचायत निवडणूक

विदर्भातील ६२८ गावांचा कारभारी कोण? याचा फैसल करण्यासाठी आज ग्रामपंचायत निवडणूक पार पडतेय. विदर्भातील ६२८ ग्रामपंचायतीसाठीच्या मतदानाला सुरुवात थोड्याच वेळात होणार आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक ३६१ ग्रामपंचायतीत आज मतदान होतंय. विदर्भात नाना पटोले, विजय वडेट्टीवार, चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.कडेकोट सुरक्षेत ग्रामपंतायत निवडणुकीचं मतदान पार पडेल. लोकसभा निवडणूकीपूर्वी ग्रामीण जनतेचा कौल काय? याचा आज जनता फैसला करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -