Saturday, March 15, 2025
Homeसांगलीसांगली : चोऱ्या करणाऱ्या टोळीला पाठलाग करुन अटक

सांगली : चोऱ्या करणाऱ्या टोळीला पाठलाग करुन अटक

 

दुचाकी चोरी व हत्याराचा धाक दाखवून लुटणाऱ्या चौघांच्या टोळीला सांगली शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने शनिवारी अटक केली. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्याकडून हत्यारासह तीन चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक अभिजित देशमुख यांनी सांगितले.सांगली शहरात दुचाकी चोरणारे, कोयत्याच्या धाकाने जबरी चोरी करणारे तसेच घरफोडी करणाऱ्या पोलीस दप्तरी गुन्हे दाखल असणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली. या गुन्ह्यात त्यांना सहकार्य करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या तीन दुचाकी, कोयता, रोकड, सत्तूर असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याचे माहिती पोलिस निरीक्षक देशमुख यांनी दिली.सोहेल राजेसाब गलगले (वय २४, रा. अभिनंदन कॉलनी, सांगली), विशाल बाबुराव रणदिवे (वय १९, रा. चिन्मय पार्क, यशवंतनगर, सांगली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दीपावलीच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक श्री. देशमुख यांनी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांवर नजर ठेवून त्यांना पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार शाखेचे पथक शनिवारी शहरात गस्त घालत होते. त्यावेळी जुना बुधगाव रस्ता परिसरात काहीजण चोरीची दुचाकी विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली.पथकाने जुना बुधगाव रस्त्यावरील वाल्मिकी आवास योजना परिसरात जाऊन तेथे सापळा रचला. त्यावेळी चौघेजण तीन दुचाकीवरून तेथे आले. पथकातील पोलिसांनी त्यांना हटकले. त्यानंतर त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पथकाने थरारक पाठलाग करून पकडण्यात आले

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -