नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. तुमच्याकडे 10वी आणि ITI चे सर्टिफिकेट असेल तर रेल्वेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सने (BLW) अॅप्रेंटिसच्या पदांसाठी रिक्त जागा भरण्याची घोषणा केली आहे.या पदांवर काम करू इच्छिणारा कोणताही उमेदवार http://blw.Indianrailways.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतो. या भरती मोहिमेद्वारे एकूण 374 पदं भरण्यात येणार आहेत.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा कोणताही उमेदवार 25 नोव्हेंबर किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतो. तसेच, कागदपत्रं अपलोड करण्याची अंतिम तारीख 27 नोव्हेंबर 2023 आहे. जर तुम्हाला या पदांसाठी अर्ज करायचा असेल तर त्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. त्यामुळे आपण या भरती मोहिमेत अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता, शिक्षण, वयोमर्यादा, उमेदवारांची निवड कशी केली जाईल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
भरावयाच्या रिक्त पदांची संख्या किती?
ITI जागा: 300 पदं
नॉन ITI जागा: 74 पदं
रेल्वेमध्ये फॉर्म भरण्यासाठी पात्रता
नॉन ITI : उमेदवारांनी किमान 50 टक्के गुणांसह इयत्ता 10वी परीक्षा किंवा त्याच्या समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेलीअसावी. उमेदवाराने नोटिफिकेशन जारी होण्याच्या तारखेपूर्वी इथे दिलेली पात्रता उत्तीर्ण केलेली असावी.
ITI : उमेदवारांनी 10 वी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डातून त्याच्या समकक्ष परीक्षा किमान 50% गुणांसह उत्तीर्ण केली असावी. तसेच त्या उमेदवाराकडे संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र असावे.
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय
नॉन ITI उमेदवारांसाठी वयोमर्यादा 15 ते 22 वर्षे या दरम्यान आहे आणि ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान आहे.
उमेदवारांची निवड कशी केली जाईल
उमेदवारांची निवड प्रत्येक युनिटमधील गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल, जी मॅट्रिक परीक्षेतील गुणांच्या टक्केवारीच्या आधारे तयार केली जाईल.
फॉर्म भरण्यासाठी अर्ज फी किती भरावी लागेल
उमेदवारांना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. पेमेंट डेबिट/क्रेडिट किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे करावे लागले. याशी संबंधित अधिक तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार BLW च्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.