Saturday, March 15, 2025
Homeसांगलीइटकरे येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा; साडे चार लाखांची रोकड जप्त

इटकरे येथे तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा; साडे चार लाखांची रोकड जप्त

 

इटकरे (ता. वाळवा) येथे सुरू असलेल्या तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा टाकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तब्बल चार लाख ५३ हजार ३०० रुपयांची रोकड जप्त केली. पथकाने जुगार खेळणाऱ्या आठजणांना जेरबंद केले असून, यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील संशयितांचा समावेश आहे.रोहित अरविंद भोसले (वय ३०), सुरज हणमंत साखरे (३२), शुभम अशोक सुर्यवंशी (२६), अभिषेक निवृत्ती सकटे (२३, सर्व रा. क्रांती चौक, इटकरे), अविनाश हणमंत नरळे (२९, रा. कुरळप), संदीप चंद्रकांत पाटील (३५, रा. फुलेवाडी, कोल्हापूर), अवधुत प्रकाश दळवी (३२, रा. गंजीगल्ली, कोल्हापूर) आणि विशाल अशोक गिरीगोसावी (३०, रा. उमा टॉकीजजवळ, कोल्हापूर) अशी संशयितांची नावे आहेत.

 

पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार एलसीबीचे पथक गस्तीवर असताना, इटकरे फाट्याजवळील राजस्थानी हॉटेलच्या पाठीमागे काही अंतरावर मनोज माने यांच्या खुल्या पत्र्याच्या शेडमध्ये तीनपानी जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती मिळाली.

 

पथकाने तिथे जावून खात्री केली असता, सर्व संशयित जुगार खेळत होते. त्यांना पळून जाण्याची संधी न देता सर्वांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून चार लाख ५३ हजार ३०० रुपयांची रोकड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सिकंदर वर्धन, अरुण पाटील, विनायक सुतार, सुनिल जाधव, रोहन घस्ते, सुरज थोरात आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -