ताजी बातमी ऑनलाईन टीम
पुणे शहरातील गुन्हेगारीचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातला. आता बुधवारी रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल( वय 35) गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सहा गोळ्या झाळत त्यांच्याकडून सोने चांदीची बॅग पळवून नेली. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.
कशी घडली घटना
प्रतिक मदनलाल ओसवाल यांची सराफ पेढी हडपसरमधील सय्यदनगर भागत आहे. बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास दुकान बंद करुन ते वडिलांसोबत दुचाकीवरुन घरी निघाले होते. त्यावेळी बी.टी.कवडे रस्त्यावर असताना दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांना रोखले. काही कळण्याच्या आता त्यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या त्यांना लागल्या. त्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्याकडे दागिने असलेली बॅग पळवून नेले. ओसवाल यांच्या मांडीवर आणि गालावर गोळी लागल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले.
सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -