मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको या भूमिकेमुळे छगन भुजबळ महायुतीत एकटे पडलेत. शिंदे गट त्यांच्यावर संतापलाय तर खुद्द राष्ट्रवादीतूनच त्यांच्या भूमिकेला विरोध होतोय. अशातच छगन भुजबळांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. शिंदे समितीकडून आलेले आकडे आणि सरकारकडून मंत्रिमंडळ बैठकीत आलेल्या आकडेवारीवर भुजबळांनी शंका उपस्थित करतानाच एक गंभीर आरोप केला आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या. तर, ओबीसीतून नको अशी मागणी छगन भुजबळांनी केलीय. एका बाजूने कुणबी प्रमाणपत्र देत काही लोकांना घ्यायचं आणि दुसरीकडे ओबीसींविरोधात न्यायालयीन लढाईद्वारे बाहेर ढकलायचं. असा दुहेरी कार्यक्रम सध्या सुरु असल्याचा आरोपही भुजबळांनी यावेळी केला. मराठा आरक्षणाला विरोध नाही पण त्यांना वेगळं आरक्षण द्या, ओबीसीतून नको. दोन दिवसांत नोंदींचा आकडा कसा वाढला असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला.
भुजबळांना जरांगे-पाटलांनीही उत्तर दिलंय. आम्ही कुणाचंच हिसकावत नाही, ओबीसीतलं आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही घेतोय असा पलटवार जरांगेंनी केलाय. ओबीसींना जे काही मिळतं ते मराठा समाजालाही मिळालं पाहिजे अशी मागणी जरांगेंनी केलीय. तेव्हा शिक्षण, नोकरीसह राजकीय आरक्षणाचीही मागणी जरांगेंनी अप्रत्यक्षपणे केलीय.. मात्र यावर भुजबळांनी थेट इशाराच दिलाय. मराठा समाजही आता ओबीसीमध्ये आला तर कुणालाच काही मिळणार नाही.. आणि ओबीसी संपतील असा इशारा भुजबळांनी दिलाय.
छगन भुजबळ यांचा सरकारवर गंभीर आरोप; शिंदे गट संतापला, राष्ट्रवादीचीही प्रचंड चिडचिड
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -