Sunday, July 27, 2025
Homeब्रेकिंगदिवाळीनिमित्त 'या' तारखांना बँका बंद राहणार

दिवाळीनिमित्त ‘या’ तारखांना बँका बंद राहणार

देशातील सर्वात मोठा सण असलेली दिवाळी अवघ्या २ दिवसांवर आली असून सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. दिवाळी म्हंटल की सुट्ट्या या आल्याच मग त्या कंपन्यांना असो किंवा बँकांना.

 

देशात धूमधडाक्यात साजरा केला जाणारा दिवाळी हा सर्वात लोकप्रिय असा सण आहे. त्यासाठी बँकांनाही सुट्ट्या असतात. तसेच यंदाही दिवाळीनिमित्त (Bank Holidays In Diwali) किती दिवस आणि नेमक्या कोणकोणत्या तारखेला बँक बंद राहणार हे आज आपण जाणून घेऊयात.

 

खरं तर रिजर्व बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, नोव्हेंबर महिन्यात तब्बल १५ दिवस बँकांना सुट्टी आहे. म्हणजे सर्व देशात ठिकठिकाणी बँकाच्या सुट्या त्या त्या राज्यानुसार आणि सणानुसार वेगवेगळ्या आहेत. दिवाळी १२ तारखेला सुरु होत आहे, त्यानुसार बँकांना १२ , १३ आणि १४ अशा सलग ३ दिवस सुट्या असतील. १२ ला तर असाही रविवार आहेच. आणि दिवाळीनिमित्त 13 आणि 14 नोव्हेंबरला बहुतांश शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत.

 

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, 13 नोव्हेंबर रोजी आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनऊ सारख्या शहरांमध्ये गोवर्धन पूजा/लक्ष्मीपूजा/दिवाळी/दिवाळी दरम्यान बँका बंद राहतील. तर 14 नोव्हेंबर रोजी, बेंगळुरू, अहमदाबाद, बेलापुट,नागपूर, गंगटोक, मुंबई, येथील बँकांना दिवाळी (बली प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने सुट्टी असेल. त्यामुळे जर तुमची काही बँकेत कामे असतील तर सुट्यांची यादी पाहूनच बँकेत जावा अन्यथा तुमचा फुकटचा वेळ वाया जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -