Monday, December 23, 2024
Homeक्रीडाजागा 1 दावेदार 3, सेमी फायनलमध्ये कोणती टीम पोहचणार?

जागा 1 दावेदार 3, सेमी फायनलमध्ये कोणती टीम पोहचणार?

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 39 वा सामना हा 8 नोव्हेंबर रोजी पार पडला. गतविजेत्या इंग्लंड क्रिकेट टीमने नेदरलँड्सवर 160 धावांनी विजय मिळवला. इंग्लंडचा हा या स्पर्धेतील आठव्या सामन्यातील दुसरा विजय ठरला. तर नेदरलँड्सला सहाव्या पराभवाचा सामना करावा लागला. नेदरलँड्सचं या पराभवासह सेमी फायनलचं जर तरचं समीकरणही संपलं. सेमी फायनलसाठी आधीच टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने क्वालिफाय केलंय. त्यामुळे आता एका जागेसाठी कुटाणा आहे.

 

वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये पहिला सामना हा 1 विरुद्ध 4 आणि 2 विरुद्ध 3 असा होणार आहे. सोप्या भाषेत सेमी फायनल 1 मॅच पॉइंट्स टेबलमधील अव्वलस्थानावर असलेली टीम आणि चौथ्या क्रमांकावर असलेला संघ यांच्यात होईल. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावरील टीममध्ये दुसरी सेमी फायनल होईल. दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसरी सेमी फायनल होणार हे निश्चित आहे. तर टीम इंडिया नंबर 1 आहे. मात्र चौथी टीम अजूनही ठरलेली नाही. त्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात खडाजंगी आहे. या तिघांपैकी मोठ्या फरकाने जिंकणारी टीमच सेमी फायनलमध्ये पोहचेल.

 

न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्या 9 नोव्हेंबर रोजी बंगळुरुत सामना होणार आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकला, तर ते सेमी फायनलमध्ये पोहचतील. पण या सामन्यावर पावसाचं सावट असल्याने मॅच रद्दही होऊ शकते. त्यामुळे पाकिस्तानला फक्त इंग्लंड विरुद्ध जिंकून सेमी फायनलमध्ये पोहचण्याची संधी आहे. पण तिथे अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिका विरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवल्यास चित्र बदलू शकतं. त्यामुळे एका जागेसाठी फार मोठी स्पर्धा आहे.

 

न्यूझीलंड-श्रीलंका सामना पावसामुळे रद्द झाला, तर दोन्ही टीमला 1-1 पॉइंट मिळेल. त्यामुळे न्यूझीलंडचे 9 पॉइंट्स होतील. तसेच पाकिस्तान इंग्लंड विरुद्ध जिंकल्यास त्यांच्या खात्यात 10 पॉइंट्स होतील. तर अफगाणिस्तानही दक्षिण आफ्रिका विरुद्ध जिंकल्यास त्यांचेही 10 गुण होतील. मग नेट रनरेटवर सर्व हिशोब होईल. त्यामुळे न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तिन्ही संघांचा मोठा फरकाने विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -