Monday, December 23, 2024
Homeमनोरंजनमनिष मल्होत्राच्या पार्टीत सलमाननं ऐश्वर्याला घेतलं मिठीत! VIDEO मागचं सत्य काय

मनिष मल्होत्राच्या पार्टीत सलमाननं ऐश्वर्याला घेतलं मिठीत! VIDEO मागचं सत्य काय

सध्या सर्वत्र दिवाळीचं वातावरण पाहायला मिळतंय. दिवाळी पार्टीसाठी बॉलिवूड कलाकार एकत्र आले आहेत. अनेक निर्माते, कलाकारांच्या घरी दिवळीची जंगी पार्टी आयोजित करण्यात आली आहे.

 

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर मनिश मल्होत्रा यानं देखील त्याच्या घरी खास दिवाळी पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये अभिनेता सलमान खान देखील आला होता. सलमान खाननं पार्टीत अभिनेत्री आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायला मिठी मारल्याचं म्हटलं जातं आहे. एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात तो एका मुलीला मिठी मारताना दिसतोय. ही मुलगी ऐश्वर्या राय असल्याचं म्हटलं जातंय. खरंच ती मुलगी ऐश्वर्या आहे का? सलमान आणि ऐश्वर्या यांचं पॅचअप झालंय का? तो पहिल्यासारखे मित्र आहेता का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा फोटो हा मनीष मल्होत्राच्या दिवाळी पार्टीमधील आहे. ज्यात सलमान खान आणि ऐश्वर्या यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. पार्टीमध्ये ऐश्वर्यानं लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर सलमान खान ग्रे टी-शर्टमध्ये आला होता. मनिष मल्होत्रा त्याची पार्टी कॅमेरापासून दूर ठेवतो. त्यामुळे पार्टीमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता असते. अशातच सलमान खानचा पार्टीमधून बाहेर येताचाना व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो एका मुलीला मिठी मारताना दिसतोय. या मुलीनं लाल रंगाचे कपडे घातले होते. ही मुलगी ऐश्वर्या असल्याचं म्हटलं जातंय.

 

हेही ‘हॅलो अमित, ही फिल्म तू कर…’; जितेंद्रचा 1 फोन अन् अमिताभच्या ‘त्या’ सिनेमानं रचला इतिहास, आता येतोय पार्ट 3

 

अभिनेत्री ऐश्वर्या राय देखील पार्टीला आली होती. तिनं लाल रंगाचा ड्रेस घातला होता. तर सलमान खान फोटोमध्ये ज्या मुलीला मिठी मराताना दिसतोय त्या मुलीनं देखील लाल रंगाचा ड्रेस घेतल्याचं पाहायला मिळलंय. पण संपूर्ण व्हिडीओमध्ये त्या मुलीचा चेहरा दिसत नाहीये.

 

 

काय आहे सत्य?

 

व्हायरल होत असलेल्या फोटो आणि व्हिडीओमध्ये सलमान खान ज्या मुलीला मिठी मारताना दिसतोय ती ऐश्वर्या राय होती ही माहिती चुकीची आहे. ती मुलगी ऐश्वर्या राय न्सून सूरज पांचोलीची बहिण सना पांचोली होती. सना देखील पार्टीसाठी लाल रंगाचे कपडे घालून आली होती.

 

सना ही मागून हुबेहूब ऐश्वर्यासारखी दिसत असल्याने अनेकांनी तिला ऐश्वर्या म्हटलंय. म्हणजेच सोशल मीडियावर व्हायरल होणारा क्रॉप्ड फोटो ऐश्वर्या नाही सना हिचा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -