Friday, November 22, 2024
Homeसांगलीएटीएम फोडून ३७ लाख लंपास चिकोडी, अंकलीतील घटना; दिवाळीत चोरांचा धुमाकूळ

एटीएम फोडून ३७ लाख लंपास चिकोडी, अंकलीतील घटना; दिवाळीत चोरांचा धुमाकूळ

ऐन दिवाळीच्या तोंडावर ऑनलाईनचा वापर जास्त होत असल्याने पैशांनी भरलेली एटीएम लक्षात घेवून सशस्त्र चोरट्यांनी चिकोडी व अंकली येथील दोन एटीएम फोडून सुमारे ३७ लाख ५२ हजार रूपयांवर डल्ला मारल्याची घटना गुरूवारी सकाळी उघडकीस आली. गॅस कटर, कटावणी व इतर साहित्यांचा वापर करीत एटीएम फोडल्याचा पोलीसांचा अंदाज आहे. घटना बुधवारी रात्री घडली असून सकाळी उघकीस आल्यानंतर चिकोडी विभागातील सर्व पोलीस ठाण्याचे तज्ञ व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

या घटनेत चोरट्यांनी चिकोडी शहरातील अंकली रोडवर असलेल्या आंबेडकर नगरजवळ एसबीआय बँकेचे एटीएम फोडून २३ लाख व अंकली येथील बसस्थानकाजवळ असलेले अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडून १४ लाख ५२ हजार ५०० रुपये चिकोडीत इंडियन ओरसेस बँकेचे चोरट्यांनी लांबविले आहेत. तर एटीएम फोडण्यात अपयश आले आहे.

 

चिकोडी तालुक्यातील अंकली बसस्थानकावर मुख्य वर्दळीच्या एका इमारतीत अॅक्सीस बँकेचे एटीएम आहे. बुधवारी रात्री चोरट्यांनी गॅस एटीएम सुविधा सुरू झाल्यानंतर प्रत्येक बँकेने या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक केली होती. त्यामुळे एटीएममध्ये चोरी, छेडछाडी किंवा इतर घटना घडत नव्हत्या. स्वच्छताही राखली जात होती. मात्र सीसीटीव्ही आणि सायरन सुरक्षा दाखवित बॅकांनी सुरक्षा रक्षकांना काढून टाकले. त्यानंतर अनेक चोरीच्या किंवा इतर घटना घडल्या आहेत. अनेक वेळा पैसे न काढता एटीएममध्ये उचापती करणारे आढळून आले. पण सीसीटीव्ही असल्याचे सांगणारे अधिकारी तात्काळ एटीएमकडे आल्याचे दिसून आलेले नाहीत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -