बॉलिवूड लोकप्रिय अभिनेता सलमान खानचा ‘टायगर 3’ हा परवा 12 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. सलमानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते आतुर आहेत.
चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु आहे. आगाऊ बूकिंगमध्ये सलमाननं ‘पठाण’ आणि ‘जवान’ला मागे टाकलं आहे. आता जी माहिती समोर आली आहे. त्यामुळे निर्मात्यांना आनंद होत आहे. ‘टाइगर 3’ प्रदर्शनाच्या आधीच चित्रपट दोन देशांमध्ये बॅन करण्यात आला आहे.
मीडिया रिपोर्ट्स, सलमान खानच्या ‘टायगर 3’ ला ओमान आणि कतारसारख्या देशांमध्ये बॅन करण्यात आलं आहे. बॅनमुळे इस्लामिक देशांमध्ये आणि त्या लोकांना निगेटिव्ह म्हटलं जातं आहे. या दोघं देशांमध्ये ‘टायगर 3’ ला बॅन होण्यानं निर्मात्यांना मोठा शॉक लागला आहे. ट्रेड एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार, वर्ल्ड वाईड बॉक्स ऑफिसवर परिणाम होणार आहे. यावेळी निर्मात्यांना कोटी रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या देशांमध्ये बॅन असल्याची माहिती निर्मात्यांनी दिलेली नाही.
सलमान खानच्या ‘टायगर 3’ ची निर्मिती मनीष शर्मानं केलं आहे. सलमान खान आणि कतरिना कैफ यांची जोडी पुन्हा एकदा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात इमरान हाश्मी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाची 2 लाख पेक्षा जास्त तिकिटं विकली आहेत. 5 नोव्हेंबर पासून ‘टाइगर 3’ च्या आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. काही तासातच चित्रपटाती तिकिट विकायला सुरुवात झाली आहे. आता तीन दिवसात आगाऊ बूकिंग ही 8 कोटींच्या पार झाली आहे. 2 लाख 88 हजार 515 तिकिट बूक झाली आहेत. अशा चर्चा सुरु आहेत की 2023 या वर्षात पहिल्या दिवशी सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरण्याची शक्यता आहे.
sacnilk च्या रिपोर्टनुसार, अविनाश राठौड उर्फ टायगरला अॅक्शन करताना पाहण्यासाठी महाराष्ट्र, पश्चिम बंगाल ते दिल्लीच्या प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या तिन्ही राज्यातून 1 कोटी पेक्षा जास्त कमाई झाली आहे. तर दुसरीकडे ‘टायगर 3’ ला गुजरात, कर्नाटक, तेलंगाना पासून यूपी पर्यंत फक्त 50 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.