निमित्ताने या महिन्यात देशभरातील अनेक राज्यांमध्ये आजपासून पाच दिवस बँका बंद (Bank Holidays) राहणार आहेत. विविध राज्यात बँकांना सलग पाच दिवस सुट्ट्या असतील. दिवाळीची सुरुवात धनत्रयोदशीने होते आणि 15 नोव्हेंबरला (November 2023 Bank Holidays) भाऊबीजला दिवाळी संपते. आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, शुक्रवारपासून सलग सहा दिवस बँका बंद असतील. धनत्रयोदशीपासून सलग सहा दिवस बँकांची सुट्टी असेल. दिवाळीत धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मी पूजन, भाऊबीज या निमित्ताने बँका बंद राहतील. त्याशिवाय दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी बँकांची नियमित सुट्टी असते. सिक्कीममध्ये सलग चा दिवस बँकांना सुटी असेल. यामध्ये दुसरा शनिवार, रविवार त्यानंतर सोमवार, मंगळवार आणि बुधवारचा समावेश आहे.
नोव्हेंबर महिन्यात एकूण 15 दिवस बँका बंद
नोव्हेंबरमध्येच, चित्रगुप्त जयंती, दिवाळी, छठ पूजा, गुरु नानक जयंती, कार्तिका पौर्णिमा, कनकदास जयंती या प्रसंगी बँकांनी सुट्टी असेल. विविध सण आणि राष्ट्रीय कार्यक्रम (November 2023 Bank Holidays) निमित्त नोव्हेंबरमध्ये अनेक राज्यांमध्ये 15 दिवस बँका बंद राहतील. मात्र, या कालावधीत UPI, मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंग यांसारख्या डिजिटल सेवा उपलब्ध राहतील. तुम्ही हे वापरू शकता. दिवाळी आणि धनत्रयोदशीसाठी, राज्यातील बँका सहा दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार आणि दुसरा शनिवार याचाही समावेश आहे.
दिवाळीत बँकांना सुट्टी
11 नोव्हेंबर (शनिवार) – दुसऱ्या शनिवारी बँकांची नियमित सुट्टी
12 नोव्हेंबर (रविवार) – रविवारमुळे बँका बंद
13 नोव्हेंबर (सोमवार) – गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा (दीपावली)/दिवाळी: त्रिपुरा, उत्तराखंड, सिक्कीम, मणिपूर, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात बँका बंद आहेत.
14 नोव्हेंबर (मंगळवार) – दिवाळी (बळी प्रतिपदा)/दीपावली/विक्रम संवंत नवीन वर्षाचा दिवस/लक्ष्मी पूजा – गुजरात,
महाराष्ट्र
, कर्नाटक, सिक्कीम.
15 नोव्हेंबर (बुधवार) – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मी पूजा / सेंग कुत्स्नेम – सिक्कीम, मणिपूर, उत्तर प्रदेश, बंगाल, हिमाचल प्रदेशमध्ये बँका बंद आहेत.
नोव्हेंबर महिन्यामधील इतर सुट्ट्या
19 नोव्हेंबर (रविवार) – बँकांची नियमित सुट्टी
20 नोव्हेंबर : छठ पूजा असल्याने बिहारसह राजस्थानमध्ये बँकांना सुट्टी असेल.
23 नोव्हेंबर : सेंग कुत्स्नेम आणि इगास बागवाल यांचा सण साजरा केला जाणार आहे. या दिवशी उत्तराखंड आणि सिक्कीममध्ये सुट्टी असेल.
25 नोव्हेंबर : या दिवशी चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहतील.
26 नोव्हेंबर : रविवारची सुट्टी
27 नोव्हेंबर : गुरु नानक जयंती, कार्तिक पौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे. त्रिपुरा, मिझोराम, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणा, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल,
महाराष्ट्र
,
नवी दिल्ली
, बिहार, झारखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये या दिवशी सुट्टी असेल.
30 नोव्हेंबर : कनकदास जयंती. कर्नाटकात या दिवशी बँका बंद राहणार आहेत.