Tuesday, July 29, 2025
Homeब्रेकिंगमनोज जरांगे यांची सांगलीतील विट्यात जाहीर सभा, मराठा समाज एकवटणार

मनोज जरांगे यांची सांगलीतील विट्यात जाहीर सभा, मराठा समाज एकवटणार

 

मराठा आरक्षणासाठी लढणारे मराठा योध्दा मनोज जरांगे-पाटील यांच्या दौऱ्यास दिवाळीनंतर पुन्हा सुरूवात होत असून १७ नोव्हेंबरला ते मायणीमार्गे विटा येथे येणार असून विट्यातील चौंडेश्वरी चौकात त्यांची जाहीर सभा होणार आहे.

 

मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शंकर मोहिते यांनी याबाबत माहिती दिली.

 

मोहिते म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत मुदत दिल्यानंतर जरांगे-पाटील तिसऱ्या टप्प्यात पुन्हा महाराष्ट्राचा दौरा करीत आहेत. या दौऱ्याला १५ नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. जरांगे-पाटील विटा मार्गे सांगलीकडे जाणार आहेत. दरम्यानच विटा येथे १७ नोव्हेंबरला सकाळी ८.३० वाजता चौंडेश्वरी चौकात जाहीर सभा होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -