Saturday, November 23, 2024
Homeब्रेकिंगनिवडणुकांच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या किमती कमी होणार?

निवडणुकांच्या तोंडावर गॅस सिलिंडरच्या किमती कमी होणार?

 

सणासुदीचा काळ अगदीच तोंडावर असताना वाढत जाणारी महागाई आपलं जगणं मुश्कील करत आहे. आधी टोमेटो, मग कांदा आणि आता सिलिंडरच्या किमतींमध्ये वाढ होईल का अशी चिंता वर्तवली जात आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक सिलिंडरांच्या किमतींमध्ये वाढ झालेली पाहायला मिळाली. यामुळे सामान्य माणसाच्या खिश्यावर नक्कीच परिणाम होतो कि काय अशी चिन्ह समोर येत असताना केंद्र सरकारकडून घरगुती सिलिंडरांच्या किमती कमी करण्यात येऊ शकतात अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहेत.

 

LPG च्या किमती कमी होणार: LPG Cylinder Price

वर्ष 2024 मध्ये निवडणुका होणार आहे, त्यामुळे सध्याचे मोदी सरकार ग्राहकांना सवलतीच्या दरांत सिलिंडर उपलब्ध करून देण्याची शक्यता आहे. समोर आलेल्या माहितीच्या आधारे सांगायचं झाल्यास आत्ताच्या घडीला सरकार LPG सिलिंडरवरील सबसिडी वाढवण्याचा विचार करत आहे. हि बातमी जर का खरी असेल तर केंद्र सरकार कडून प्रधान मंत्री उज्वला योजने अंतर्गत सिलिंडरच्या अनुदानात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. आणि असं झाल्यास देशातील सामन्य जनतेच्या तोंडावर नक्कीच प्रसन्न हास्य पाहायला मिळेल.

 

सध्या उज्वला योजनेच्या अंतर्गत 12 सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) खरेदीवर 300 रुपये प्रती सिलिंडर सबसिडी दिली जाते. केंद्र सरकारकडून सुमारे 9.6 कोटी देशातील कुटुंबातील गरजू कुटुंबांना याचा लाभ मिळवून देण्यात आला होता. कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सबसिडीची किंमत 200 रुपयांवरून 300 रुपये करण्यात आली आहे. आणि आता हि संख्या 10 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे, पाच राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकींमध्ये या सिलिंडरच्या किमती (LPG Cylinder Price) नक्कीच बाजी पालटवू शकतात अशी चिन्ह दिसत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -