Friday, November 22, 2024
Homeसांगलीघरात पैसे देत नसल्याने वाद पेटला; भर दिवाळीत सख्ख्या लहान भावाकडून मोठ्या...

घरात पैसे देत नसल्याने वाद पेटला; भर दिवाळीत सख्ख्या लहान भावाकडून मोठ्या भावाचा निर्घृण खून

 

घरात मोठा भाऊ पैसे देत नसल्याने झालेल्या वादात सख्ख्या लहान भावाने मोठ्या भावाचा भर दिवाळीत निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना घडली. शिराळा तालुक्यातील कापरीमध्ये लहान भावाने डोक्यात लाकडी दांडक्याने डोक्यात प्रहार केल्याने महेश राजेंद्र मोरे (वय 27 ) याचा जागेवरच मृत्यू झाला.या घटनेनंतर संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय 22) हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पैशाच्या वादावादीतून ही घटना घडली.

 

पैशातून सातत्याने वादावादी

 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मयत महेश आणि संशयित आरोपी अविनाश मोरे कापरीत आईसह लहानपनापासून आजोळी राहतात, तर वडिल गावी राहतात. मय महेशचं लग्न झालं असून तो घटस्फोटित होता. महेश आणि त्याचा भाऊ अविनाशमध्ये सातत्याने पैशावरून वादावादी होत होती. महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याने घरात सातत्याने वादावादी सुरु होती. महेशकडे पैसे मागितल्यास भांडणे करत होता. याच पैशाच्या वादातून रविवारी रात्री पुन्हा भांडण लागले. दोघांची रस्त्यावर भांडणे लागली. या भांडणात अविनाशने महेशच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केला. डोक्यात दणका बसल्याने महेश गंभीर जखमी झाला व खाली कोसळला. डोक्यात गंभीर मारहाण झाल्याने रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाला. महेशच्या पश्चात आई, वडील असा परिवार आहे. शिराळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून कापरीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -