Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाND vs NZ मुंबईत वानखेडेला होणाऱ्या सामन्याच्या मूळ तिकीटाची किंमत काय? १४...

ND vs NZ मुंबईत वानखेडेला होणाऱ्या सामन्याच्या मूळ तिकीटाची किंमत काय? १४ पट महाग विकणाऱ्या तरुणाला अटक

 

 

१५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या भारत आणि न्यूझीलंड या आयसीसी विश्वचषक उपांत्य फेरीच्या सामन्याच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी एका ३० वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. आकाश कोठारी असे आरोपीचे नाव असून तो मालाडचा रहिवासी आहे. त्याच्या राहत्या घरातून आकाशने हा काळाबाजार सुरु केला होता.

 

पोलिस उपायुक्त (DCP) प्रवीण मुंडे यांच्या हवाल्याने फ्री प्रेस जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना मुंबईत क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वानखेडे स्टेडियमवर होणार असल्याने साहजिकच क्रिकेटप्रेमी हा सामना प्रफत्यक्ष बघण्यासाठी उत्सुक आहेत. पण याच उत्साहाचा गैरफायदा घेत आकाशने तिकिटांची किंमत साधारण ३५- ४० हजाराच्या दरम्यान सांगितली आहे. विशेष म्हणजे मूळ तिकीटाची किंमत ही फक्त अडीच (२,५००) हजार इतकीच आहे, पण आकाशने त्या वैध रक्कमेच्या चौदा पट मोठी रक्कम प्रेक्षकांकडून उकळली आहे.

 

पोलिसांनी आरोपींना कसे पकडले?

पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर त्यांनी जेजे मार्ग पोलिस ठाण्यातील पोलिसांचा समावेश असलेले एक पथक तयार केले होते. ही टीम मालाडमध्ये पोहोचली आणि कोठारीला पकडण्यात यश आले. तपासादरम्यान त्याच्याकडे काही मेसेज आणि काही कागदपत्रेही सापडली आहेत. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक) आणि ५११ (आजीवन कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्याचा प्रयत्न केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपींनी सामन्याची तिकिटे कुठून आणली याचा अधिक तपास सुरू असल्याचे मुंडे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -