Tuesday, November 28, 2023
Homeक्रीडामुंबईच्या वानखेडेवर आज महासंग्राम; न्यूझीलंडचा वचपा अन् फायनल गाठण्यासाठी टीम इंडिया मैदानात

मुंबईच्या वानखेडेवर आज महासंग्राम; न्यूझीलंडचा वचपा अन् फायनल गाठण्यासाठी टीम इंडिया मैदानात

 

एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला सेमीफायनलचा सामना आज (15 नोव्हेंबर) खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे संघ आमनेसामने असतील. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दुपारी 2 वाजल्यापासून खेळवला जाईल.ऐतिहासिक वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) सज्ज झालंय विश्वचषकाच्या (ICC World Cup 2023) पहिल्या सेमीफायनलसाठी (World Cup Semifinal). या सामन्यात यजमान टीम इंडियाचा (Team India) मुकाबला न्यूझीलंडशी (New Zealand) होणार आहे. विश्वचषकाच्या (World Cup 2023) साखळीत धर्मशालामध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियानं न्यूझीलंडला चार विकेट्सनी हरवलंय. पण म्हणून न्यूझीलंडच्या आव्हानाला कमी लेखता येणार नाही. कारण केन विल्यमसनच्या (Kane Williamson) न्यूझीलंड संघात कमालीची गुणवत्ता आहे. याच न्यूझीलंडनं 2019 सालच्या विश्वचषकात टीम इंडियाला हरवून अंतिम फेरीत धडक मारली होती. त्यामुळं त्या पराभवाची परतफेड करण्याची संधी रोहित शर्माच्या भारतीय क्रिकेट संघाला आज वानखेडे स्टेडियमवर मिळणार आहे. टीम इंडियानं विश्वचषकाच्या साखळीत नऊपैकी नऊ सामने जिंकून फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यांवर आपली ताकद दाखवून दिली आहे. न्यूझीलंडच्या खात्यात नऊपैकी पाच सामन्यांमध्ये विजय आणि चार सामन्यांमध्ये पराभव अशी कामगिरी आहे. त्याच पार्श्वभूमीवर दोन्ही संघ वानखेडेच्या मैदानात आज आमनेसामने येणार आहेत.यावेळी भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकात सलग 9 सामने जिंकल्यानंतर आत्मविश्वासानं भरलेला आहे, पण आता बाद फेरीतील मागील कामगिरीत फरक पडलेला नाही. रोहित ब्रिगेडला वर्ल्डकपच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वोत्तम कामगिरी करावी लागणार आहे.

 

गेल्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा बदला रोहित घेणार का?

2019 च्या मँचेस्टर विश्वचषकात याच किवी संघाविरुद्ध झालेल्या पराभवाच्या जखमा भारतीय क्रिकेट संघाच्या मनात अजूनही ताज्या आहेत. 2021 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्येही न्यूझीलंडनं टीम इंडियाचा पराभव केलेला. मात्र, यावेळी भारतीय क्रिकेट संघ वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहे.

 

यावेळी भारतीय क्रिकेट संघाची कामगिरी इतकी शानदार राहिली आहे की, विश्वचषकाच्या जेतेपदाची प्रतीक्षा टीम इंडिया लवकरच संपवेल अशी अपेक्षा जणू सर्वच चाहत्यांना आहे. वानखेडे स्टेडियमवरील टीम इंडियाची कोणतीही चूक कोट्यवधी चाहत्यांची मनं तोडेल हे रोहित शर्मा आणि टीमला चांगलंच ठाऊक आहे. या स्टेडियमवर 2011 मध्ये टीम इंडियानं 28 वर्षांनी एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

 

वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंड संघाचा रेकॉर्ड

एकूण वनडे सामने : 03

जिंकलेले सामने : 03

पराभव झालेले सामने : 01

 

वानखेडे स्टेडियमवर टीम इंडियाचा वनडे रेकॉर्ड

एकूण वनडे सामने : 21

जिंकलेले सामने : 12

पराभव झालेले सामने : 09

 

वानखेडेवर नाणेफेकीची भूमिका महत्त्वाची ठरणार

विश्वचषक 2023 मधील टीम इंडियाची आतापर्यंतची कामगिरी धडाकेबाज आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही की, टीम इंडियावर दबाव नाही. टीम इंडियाच्या खांद्यावर देशभरातील अब्जावधी लोकांच्या अपेक्षांचं ओझं आहे. अशातच रोहितसेना प्रचंड मोठ्या दबावाखाली असणार हे मात्र नक्की. पण अशातच कर्मधार रोहित आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या दोघांनाही विश्वास आहे की, टीम इंडिया देशवासियांची मनं अजिबात मोडणार नाही.

 

रोहितनं नाणेफेक जिंकून योग्य निर्णय घ्यावा, अशी प्रार्थना सध्या प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहता करतोय. वानखेडेच्या मैदानावर लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ फ्लडलाईटमध्ये झटपट विकेट गमावत असल्याचं आपण यापूर्वीच्या सामन्यांमध्ये पाहिलं आहे. कारण नवीन चेंडूला जबरदस्त स्विंग मिळतो. टीम इंडिया आणि न्यूझीलंडचे गोलंदाज नव्या चेंडूनं खेळताना प्रतिस्पर्धी फलंदाजांसाठी धोकादायक ठरू शकतात. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे सलामीवीर रोहित आणि शुभमन गिल यांच्यावर बरंच काही अवलंबून असेल.

 

कशी असेल दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा.

 

न्यूजीलंडचा संघ : टॉम लॅथम (कर्णधार), डेवॉन कॉन्वे, विल यंग, मार्क चॅपमॅन, डेरिल मिचेल, जेम्स नीशाम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सेंटनर, ईश सोढ़ी, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन आणि मॅट हेन्री.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र