Friday, June 21, 2024
Homeक्रीडाअफगाणिस्तान करेल का न्यूझीलंडची शिकार? भारतीयांचे सामन्‍याकडे लक्ष

अफगाणिस्तान करेल का न्यूझीलंडची शिकार? भारतीयांचे सामन्‍याकडे लक्ष

सर्व भारतीयांचे लक्ष रविवारी (दि. ७) होणाऱ्या अफगाणिस्तान विरुद्ध न्यूझीलंडच्या सामन्याकडे लागले आहेत. ICC T20 World Cup T २० वर्ल्डकप ग्रुप २ मधील या दोन संघात हा सामना रंगणार आहे. भारताने शनिवारी स्कॉटलंड विरुद्ध मोठा विजय नोंदवला आहे. शिवाय या विजयासह त्यांनी आपला रनरेट अफगाणिस्तानपेक्षाही सरस केला आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडला मात दिली. तर भारतीय संघाचा सेमिफायनलचा मार्ग सुकर हाेणार आहे.

टी २० वर्ल्डकपमध्ये ICC T20 World Cup न्यूझीलंडने पाकिस्तान वगळता अन्य संघासोबत चांगली कामगिरी केली आहे. पाकिस्तानने न्यूझीलंडला पराभूत केले. तर न्यूझीलंडने भारत, स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केले आहे. न्यूझीलंड ६ गुण मिळवत गुणतालिकेत दुसऱ्यास्थानी आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान संघाने स्कॉटलंड आणि नामिबियाला पराभूत केले आहे. तसेच या संघाने पाकिस्तानला कडवी लढत दिली होती. अफगानिस्तानकडे चांगली फलंदाजी आहे. तसेच त्यांच्या संघात चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत. त्यामुळे ते न्यूझीलंडला कडवी टक्कर देतील, असे मानले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -