Wednesday, September 27, 2023
Homeक्रीडाअफगाणिस्तानचं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 125 धावांचं आव्हान, भारतीय चाहत्यांच्या सामन्याकडे नजरा

अफगाणिस्तानचं न्यूझीलंडसमोर विजयासाठी 125 धावांचं आव्हान, भारतीय चाहत्यांच्या सामन्याकडे नजरा

अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यात सुपर-12 चा महत्त्वपूर्ण सामना खेळला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने 8 गडी गमावून 124 धावा केल्या आहेत. सलामीवीर मोहम्मद शहजाद आणि हजरतुल्ला झाझाई यांनी कर्णधाराचा निर्णय चुकीचा ठरवला. हे दोन्ही फलंदाज 12 धावांपर्यंत पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर रहमानउल्ला गुरबाज (6) देखील विशेष काही करू शकला नाही.

अफगाणिस्तानने 19 धावापर्यंत 3 विकेट गमावल्या होत्या. येथून नजीबुल्ला झाद्रानने गुलबदिन नायब (15) सोबत चौथ्या विकेटसाठी 37 धावा जोडल्या. झाद्रानने 48 चेंडूत 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 73 धावांची दमदार खेळी केली. त्याच्याशिवाय कर्णधार मोहम्मद नबीने संघाच्या खात्यात 14 धावांची भर घातली. विरोधी संघाकडून ट्रेंट बोल्टने 3, तर टीम साऊथीने 2 बळी घेतले. याशिवाय अॅडम मिलने, जेम्स नीशम आणि ईश सोधीने 1-1 विकेट घेतली.या सामन्याचा थेट परिणाम टीम इंडियाच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या शक्यतांवर होणार आहे.

RELATED ARTICLES

ब्रेकिंग न्यूज

महाराष्ट्र