Friday, May 9, 2025
Homeसांगलीसांगली : गुंठेवारी नियमानुकूलसाठी ४० हजारांची लाच घेताना नायब तहसिलदारास अटक

सांगली : गुंठेवारी नियमानुकूलसाठी ४० हजारांची लाच घेताना नायब तहसिलदारास अटक

 

 

गुंठेवारी नियमानुकूल करण्यासाठी कडेगावच्या नायब तहसिलदारास ४० हजारांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने शुक्रवारी अटक केली. या घटनेने महसूल विभागात खळबळ माजली आहे. तक्रारदार यांनी विक्री केलेल्या जमिनीची अकृषीक आकारणी करून गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी कडेगाव प्रांताधिकारी कार्यालयातील नायब तहसिलदार सुनिल जोतीराम चव्हाण, यांनी तक्रारदाराकडे ४५,००० रूपयांची लाच मागितली होती. विक्री केलेल्या जमिनीची गुंठेवारी नियमानुकुल आदेश देण्यासाठी ४५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४० हजार रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -